मजकुरावर जा
मुखपृष्ठ छायाचित्र नाही

आझाद क्रिडा व सांस्कृतिक मित्र मंडळ

Azad Krida Va Sanskrutik Mitra Mandal

जळगावचा चिंतामणी

20, बळीराम पेठ, जळगाव - 425001, Jalgaon Shahar, Jalgaon, Maharashtra, India स्थापना 1996 31 वर्षांची गणेशोत्सव परंपरा श्री. अश्विन भोळे F-3781 2 वेळा पाहिले

माहिती

आजाद क्रीडा व सांस्कृतिक मित्रमंडळ (कवसामध्ये जळगावचा चिंतामणी) आजाद क्रीडा व सांस्कृतिक मित्रमंडळाची स्थापना सन १९९६ रोजी झाली. गेल्या अनेक वर्षांपासून मंडळाने विविध धार्मिक, ऐतिहासिक, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर आकर्षक आरास व देखावे सादर करून आपली आगळीवेगळी परंपरा जपली आहे. मंडळाने आतापर्यंत विविध धर्मांच्या श्रद्धास्थानांचा आणि ऐतिहासिक-सांस्कृतिक विषयांचा समावेश असलेले देखावे सादर केले आहेत. यामध्ये शनी शिंगणापूर, अमृतसर येथील सुवर्ण मंदिर, गेटवे ऑफ इंडिया, त्र्यंबकेश्वर मंदिर, जेजुरी, संत बाबा अर्दास राम मंदिर (जळगाव), लोटस मंदिर, अकलूजचे गणपती मंदिर, गुहेतील कालिकामाता मंदिर, गुरुदत्त मंदिर, गोवा, ताजबंदी, भोजराजेतील पिंड, शिर्डी येथील साईबाबा मंदिर, पंढरपूर येथील विठुराया मंदिर, सियाचीन ग्लेशियर बॉर्डर, विज्ञान नगरी, आयएनएस विक्रांत, हाजी अली इत्यादींचा समावेश आहे. मंडळाची विशेष ओळख म्हणजे जात-पात आणि धर्माचा भेद न करता सर्वांना सोबत घेऊन विविध धर्मीय श्रद्धास्थानांचे देखावे सादर करणे. त्यामुळे मंडळाने आजपर्यंत विविध धर्मांच्या श्रद्धा आणि संस्कृतींचा सन्मान करत सर्वधर्मीय आरास साजरी केली आहे. याशिवाय एका वर्षी गणपतीची आकर्षक सभामंडपाची प्रतिकृती देखील मंडळाने साकारली होती. या वर्षी मंडळाने अंटार्क्टिका येथील ‘ऑपरेशन गंगोत्री’ या विषयावर भव्य आरास सादर केली आहे. भारताच्या अंटार्क्टिका मोहिमेचा आणि देशाच्या वैज्ञानिक प्रगतीचा गौरव करणारा हा विषय मंडळाने यावर्षी साकारला आहे. धार्मिक श्रद्धा, सर्वधर्मसमभाव, सामाजिक बांधिलकी आणि सांस्कृतिक वारसा जपत आजाद क्रीडा व सांस्कृतिक मित्रमंडळाची ही गौरवशाली वाटचाल गेली अनेक वर्षे अविरत सुरू आहे.

जवळची मंडळे

संबंधित मंदिरे

अधिक शोधा

वारसा शोध सुरू ठेवा